ल्वांगप्राबांग
ल्वांगप्राबांग : लाओसच्या उत्तर भागाकडील एक शहर व मेकाँग नदीवरील बंदर, लोकसंख्या ४४,२४४ (१९७३). व्ह्यँत्यान या देशाच्या राजधानीपासून उत्तर-वायव्येस २१ किमी. अंतरावर, मेकाँग नदीच्या पूर्व तीरावर हे शहर वसलेले आहे. १३५३ पासून ल्वांगप्राबांग (म्वाँग स्वा) ही लान् झांग राज्याची राजधानी होती.